नाशिक : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट व मंदिरे स्वच्छता अभियान
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती समारोह कार्यक्रमा अंतर्गत राजमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेले घाट, मंदिरे व त्यांच्या स्मारकाची स्वच्छता अभियान,अहिल्याराम व्यायामशाळा पटांगण,दुतोंड्या मारुती समोर भाजपा नाशिक महानगराच्या वतीने राबविण्यात आले.यावेळी श्रीमंत महाराज होळकर सरकार संस्थान इंदूर यांच्याद्वारे अहिल्यादेवी होळकर यांनी शके १७०७ मध्ये बांधलेल्या विश्वेश्वर मंदिरात अहिल्या घाट पंचवटी येथे स्वच्छता अभियान राबवून शंखनाद करण्यात आला. तसेच अहिल्याराम मंदिरात पैठने गुरुजी यांच्या पाठशाळेच्या वतीने मंत्रोच्चाराचे पठण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.केंद्र व प्रदेश भाजपाने दिलेला राजमाता अहिल्यादेवी ३०० वा जयंती समारोह कार्यक्रम मोठया प्रमाणावर करणार व त्यांच्या कार्य कतृत्वाची माहिती सर्व सामान्यापर्यंत पोहचवणार असल्याचे प्रशांत जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस ॲड.श्याम बडोदे, सुनील केदार,नाना शिलेदार,सागर शेलार,राहुल कुलकर्णी,सोनाली कुलकर्णी,सुजाता करजगीकर, ॲड.मीनल भोसले,गीता वाघमारे बापू शिंदे,अजय आघाव,उत्तम उगले,देवदत्त जोशी,मदन निकम, अरिफ काझी,सचिन मोरे,प्रतीक शुक्ल,महेश महांकाळे,दिगंबर धुमाळ,हेमंत शुक्ल,प्रवीण आहेर, ज्ञानेश्वर काकड,विशाल जेजुरकर, प्रसाद धोपावकर,प्रवीण भाटे,वैभव क्षेमकल्याणी,पवन जोशी इ . सह नगरसेवकपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.