नशामुक्त भारत संकल्पासाठी धावणार नाशिककर!

नशामुक्त भारत संकल्पासाठी धावणार नाशिककर!
  • MG News
  • सप्टेंबर 19 2025

Share on  

भारताचे आदरणीय पंतप्रधान. मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यिात येत आहे. या उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याकार्यक्रमांतर्ग  "नशामुक्त भारत" या संकल्पनेवर आधारीत " नमो युवा रन (मॅरेथॉन) या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा,नाशिक महानगर,जिल्हाच्या वतीने करण्यात आले  आहे. या नमो युवा रन मॅरेथॉन साठी नाशिक जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत असून दिनांक १८  रोजीअखेर सुमारे ४  हजारांहून  अधिक लोकांनी नोंदणी केली असून १०  ते १५  हजार नागरिक सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
नशामुक्त भारत होण्यासाठी तरुणांचा विशेषःत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होणे यासाठी व्यापक प्रमाणतात जनजागृती करण्यात आली आहे . दिनांक २१.०९.२०२५ रोजी रविवारी सकाळी ६.०० वा. ठिकाण- ठिकाण- अनंत कान्हेरे मैदान त्रंबक रोड,नाशिक या ठिकाणाहून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. राज्याचे जलसंपदा ,कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे.  याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व  मंत्री,खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह राज्य शासनातील सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील  शालेय /महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी  सर्व प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना तसेच सर्व शासकिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या बरोबरच त्यांच्या अधिनस्त कार्यालय/संस्थेतील जास्तीत जास्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने यासाठी सर्व पदाधिकारी काम करत असून सर्व समावेशक अशी ही नमो युवा रन मॅरेथॉन असणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांच्या वतीने टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी होल्डिंग ,बॅनर लावण्यात आले असून विविध सेवाभावी संस्था देखील उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत असलेला क्यू आर कोड स्कॅन करून नोंदणी करता येऊ शकते. तसेच अधिक माहितीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा,नाशिक महानगर,जिल्हाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.     

संबंधित बातम्या