नाशिकरोड मालधक्कारोड महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथे राहणारे- सत्तार लतीफ तांबोळी वय ४४ यांनी आपली गाडी नं. एम एच १५ जीके ५३३० ही इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल आपल्या घराच्या अंगणात रात्री झोपताना चार्जिंगला लावली असता, अचानक या गाडीने पेट घेऊन, बॅटरीचा स्फोट झाल्याने तांबोळी परिवार हादरून गेला. त्याचबरोबर गाडी नं. स्विफ्ट एम एच १५ एच जी ४११२ ला आग लागल्याने अर्धे घर ही जळाले आहे.
सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाजावाटे संपूर्ण परिवार घरा बाहेर पडल्याने. मात्र कुठलीही जीवितहानी या घटनेत झालेली नाही. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. आगे ची घटना लागेचच तांबोळी यांनी तत्काळ नाशिकरोड मनपा अग्निशामक दलाला फोन करून कळविली. परंतु तब्बल एक तासानंतर आगे वर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल प्रचारण झाल्याने तांबोळी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जे काय नुकसान झाले आहे ते फक्त अग्निशामक दल आणि विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळेच असा थेट आरोप सत्तार तांबोळी यांनी केला आहे.