भारत स्वतंत्र झाल्या नंतर ५६५ संस्थाने एकत्र करून अखंड भारत निर्माण करणारे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने
"रन फॉर युनिटी" हा प्रोग्राम भारतभर राबविण्यात आला. तसेच हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून ही साजरा करण्यात आला.
या निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील ( भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर रन फॉर युनिटी मॅरेथॉन हा कार्यक्रम पार पडला.
याचा च एक भाग म्हणून वडनेर भैरव पोलीस स्टेशन अंतर्गत वडाळीभोई येथे मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले.
पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. सिद्धेश्वर आखेगावकर ( सहाय्यक पोलीस निरीक्षक ), श्री. परशराम तागड ( पोलीस उप निरीक्षक ), श्री. अमोल पवार ( पोलीस उप निरीक्षक ) व सर्व कर्मचारी यांनी नियोजन केले.
या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिक, तरुण - तरुणी, पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, एमजी ग्रुप नाशिक, गुरू गोरक्षनाथ मॉर्निंग ट्रेकिंग ग्रुप, डॉक्टर असोसिएशनचे चे सदस्य, पोलीस पाटील, उदय करीअर अकॅडमी चे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.