नाशिक - के.के.वाघच्या ५५० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड

नाशिक - के.के.वाघच्या ५५० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड
  • MG News
  • मे 23 2025

Share on  

नाशिक - के.के.वाघच्या ५५० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड

        के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदा ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अखेरच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जात असते.  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये  १६५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ५५० हून अधिक विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना सरासरी  ४.८० लाख  रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळालेले आहे.  या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार केला जात असतो.

हा उपक्रमाचा भाग म्हणून गेल्या आठवड्यात के के वाघ अभियांत्रिकीतर्फे निवड झालेल्या ८८ विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे  संस्थेचे जनसंपर्क संचालक मा.अजिंक्य बाळासाहेब वाघ व प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांच्या हस्ते औरंगाबादकर हॉल येथे सत्कार संपन्न झाला. त्यामध्ये ५४ विद्यार्थी व ३४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. या प्रसंगी विभाग प्रमुख डॉ. एस. एम. कमलापूर, डॉ. पी बी कुशारे, डॉ. पी. डी. भामरे, डॉ. आर. के. मुंजे, डॉ. सुनील कुटे, डॉ. व्ही. सी. बागल  व डॉ. पी. जे. पवार हे उपस्थित होते.

संस्थेतर्फे आयोजित कॅम्पस इंटरव्हयू तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे श्रम आणि योगदान ओळखून त्यांचे कौतुक करण्यासाठी के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती संस्थेचे जनसंपर्क संचालक मा.अजिंक्य बाळासाहेब वाघ  यांनी दिली.

FiniQ, जोश सॉफ्टवेअर, इन्फोसिस, आयबीएम, टेक महिंद्रा, एचएसबीसी, केपीआयटी, विंजित आणि एनसीडीईएक्स यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी के शहाबादकर यांनी दिली.

नोकरीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे श्रम आणि योगदान ओळखून त्यांचे कौतुक करण्यासाठी के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतल्या बद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या