नाशिक : हरिओम सांस्कृतिक संस्थेचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
सोनार समाजातील नाशिक जिल्ह्यातील हरिओम संस्कृत संस्था ही एक वधू वर सूचक मंडळ म्हणून नावाजलेली नोंदणीकृत संस्था असून समाजातील वधू वर तसेच महिला व मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
त्यातीलच एक उपक्रम म्हणून संस्थेने सामुदायिक विवाह करण्याचे योजले आहे होते.
हरी ओम सांस्कृतिक संस्थेचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा दिनांक 18 मे 2025 रोजी अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात व सामुदायिक विवाह मेळावा प्रमुख सौ. वर्षा दंडगव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मल्हारवाडी लॉन्स येथे आनंदात आणि उत्साहात पार पडला.
याप्रसंगी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
संस्थेतर्फे वधू-वर मेळावा दरवर्षी होतो आजपर्यंत संस्थेने 26 मेळाव्या घेतले आहे या मेळाव्यात महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि इतर राज्यातून देखील समाज बांधव उपस्थित असतात.
सामुदायिक विवाह प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री प्रकाश शेठ थोरात, सामुदायिक विवाह मेळावा अध्यक्ष वर्षाताई दंडगव्हाळ तसेच कार्यकारणी सदस्य योगेश शेठ दुसानिस, शशिकांत अहिरराव, किरण शेठ दुसाने, संदीप शेठ सोनार, वृंदाताई जाधव, पुनम वानखेडे, सुवर्णा घोडके, पंकज जाधव, श्याम सोनार, योगेश शेठ विसपुते, आदींनी परिश्रम घेतले
सहरील मेळावा हा समाजातील पहिला मेळावा असून येत्या आगामी काळात असे मेळावे होण्याची गरज असल्याचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ थोरात यांनी म्हटले आहे.