द्वारका चौकात रुग्णवाहिका १०८ मधील महिला डॉक्टरला मारहाण करत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडलाय .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार द्वारका चौकात अपघात होऊन एक जण जखमी झाल्याचा कॉल अंबड विभागाच्या १०८ रुग्णवाहिका चालकास प्राप्त झाला. कॉलनुसार रुग्णवाहिका चालक तत्काळ रुग्णवाहिका घेवून महिला डॉक्टर नाहील खतीब यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यांना एक जण जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. 'जखमीबरोबर कोण आहे? कुणी कॉल केला?' अशी माहिती महिला डॉक्टरने घेण्याचा प्रयत्न केला. याचा राग येऊन, त्याठिकाणी असलेल्या गर्दीतील रामसिंग बावरी नामक व्यक्तीने कॉल केल्याचे सांगितले. 'जखमीस घेऊन जा, त्याला दाखल करा' असे म्हणत डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकाशी वाद घातला.दरम्यान, महिला डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण केली, डॉक्टरच्या सांगण्यावरून रामसिंग बावरी विरूद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. , वादाला बाजू सारत डॉक्टरने आपले कर्तव्य बजावत रूग्णावर प्राथमिक उपचार केले.