इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त मनपात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त मनपात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
  • MG News
  • ऑक्टोबर 31 2025

Share on  

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने राष्ट्रीय संकल्प दिन व राष्ट्रीय एकता दिवस  साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी शालिमार येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपायुक्त अजित निकत आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिक पश्चिम स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड, उद्यान निरीक्षक किरण बोडके, सचिन देवरे, ओम खैरनार, साहेबराव भोसले, सुनील नारायणे, प्रफुल्ल तांबोळी, जे. जी. शिंदे, दीपक बंदरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे स्वागत कक्षाजवळ अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त अजित निकत संगीता नांदुरकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास ऊन नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, आस्थापना सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, आस्थापना अधीक्षक शेखर चौरे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सुरक्षा अधिकारी रमेश ताजमपुरे, मंगेश नवले, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, मनोज खैरनार, मनोज गायधनी, मनोज विभांडिक, संजय पटेल, पवन वझरे, रमेश पागे, ज्ञानेश्वर पेखळे, अनिल गवारे, यश बारगजे यांसह मनपातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यानी  उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना दिली.

श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या प्रगतीसाठी दाखविलेल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या अखंडतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करत मनपात आजचा दिवस देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.
या उपक्रमातून राष्ट्रीय एकतेचा, सामूहिक बांधिलकीचा आणि लोकसेवेच्या मूल्यांचा संदेश देण्यात आला.

संबंधित बातम्या