नवी मुंबई : रायगडात शेकापला मोठा धक्का

नवी मुंबई : रायगडात शेकापला मोठा धक्का
  • MG News
  • मे 11 2025

Share on  

नवी मुंबई : रायगडात शेकापला मोठा धक्का

पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उलवे येथील रामशेठ ठाकूर मैदानात पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले म्हात्रे बंधू अखेर भाजपमध्ये सहभागी झाले असून, हा प्रवेश विकासाच्या दृष्टीने केल्याचे जे. एम. म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशामुळे पनवेल आणि उरण भागात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, स्थानिक राजकारणात यामुळे नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या