नवी मुंबई : बेलापूर डोंगरावरील अनधिकृत मंदिरांवर सिडकोची कारवाई; पूर्ण हटवण्याची मागणी
नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी सेक्टर 8 टेकड्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळ बांधण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून थोडी थोडी जागा घेत शंभर पेक्षा अधिक मंदिरे या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. मात्र, या मंदिर प्रशासनाने वनविभाग किंवा सिडको या दोघांकडून कोणतीही परवानगी घेतली नसून हे धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचं घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोकडून या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू आहे.
दरम्यान, सेव्ह बेलापूर हिल्सने मानवी साखळी आयोजित केली होती. त्यांनतर सिडको प्रशासनाला जाग आली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम बांधले असून, सुद्धा यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे अचानक जाग आलेल्या सिडकोने ही कारवाई करत असल्याचे स्थानिक रहिवासी म्हणत आहेत. तर फक्त मंदिर परिसरात कारवाई न करता मंदिरांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी बेलापूर रहिवासीयांनी केली आहे.