नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईममध्ये वाढ होत आहे. तर जानेवारी २०२५ पासून ते आत्तापर्यंत नवी मुंबई परिसरात १५२ सायबर गुन्हे घडले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना लुबाडलं जात आहे. नवी मुंबई सायबर विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांनी दिलेल्या माहिती नुसार, जानेवारी २०२५ पासून ते आत्तापर्यंत १५२ सायबर गुन्हे घडले आहेत. त्यापैकी नवी मुंबई सायबर पोलिसांच्यामार्फत ४१ गुन्हे उघडकीस आले आहेत. आणि या गुन्ह्यामध्ये ३८ आरोपींना अटक करण्यात आले. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.