नवी मुंबई : सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात गर्दी
यंदा मान्सून लवकर दाखल होणार असून, अवकाळीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली असून, पावसाळ्यात खवाय्यांचा ताव सुक्या मच्छीवर असतो. बाजारात सुकी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होतं असून, गतवर्षी पेक्षा यावर्षी सुक्या मच्छीचे दर 10 टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. बाजारात सुकट, बोंबील, वाकट्या, खारवलेला बांगडा, करदी याची खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करत असून, दर वधारलेले असले तरी पावसाळ्यात मिळणाऱ्या चढणीच्या माशांना प्रचंड भाव असल्याने सर्वसामान्य खवाय्ये सुक्या मासळीवरच ताव मारतायत.