नवी मुंबई :भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहे. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवी मुंबईतील वाशी येथे देखील मॉक ड्रिलचे आयोजन आले होते. वाशी येथील एका सोसायटीमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले.
यावेळी जर दहशतवादी हल्ला झाला तर कशा प्रकारे स्वतःच संरक्षण करता येईल त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल केले असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तर मॉक ड्रिल हा केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तर नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नका अस आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.