लैंगिक अत्याचार व सुरक्षेबाबत नवी मुंबई पोलिसांमार्फतआदेश

लैंगिक अत्याचार व सुरक्षेबाबत नवी मुंबई पोलिसांमार्फतआदेश
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

लैंगिक अत्याचार व सुरक्षेबाबत नवी मुंबई पोलिसांमार्फतआदेश

 

 नवी मुंबई पोलीस परिमंडळ १ वाशी यांच्या मार्फत १० पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचेकडून महाराष्ट्र शासनाव्दारे विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता करावायचे उपाययोजनांबाबतच्या अमंलबजावणी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांचे थर्ड पार्टी ऑडीट करुन घेण्याच्या सूचना पोलीस उपयुक्त पंकज दहाणे यांनी दिल्या आहेत.

 

वाशी येथे शाळा/महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यांचे प्राचार्य/मुख्याध्यापक/व्यवस्थापक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता विद्यालयांमार्फत करण्यात येत असलेल्या उपययोजनांचा आढावा घेऊन विदयार्थ्यांच्या सुरक्षितेकरीता व लैंगीक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरीता सविस्तर मार्गदर्शन करुन शालेय व्यवस्थापन कमेटी व स्थानीक पोलीस ठाणे यांनी आपसात समन्वय ठेवून महाराष्ट्र शासनाव्दारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.

संबंधित बातम्या