नवी मुंबई : "कोहलीच्या निवृत्तीनंतर माजी खेळाडूंची प्रतिक्रिया"
माजी अनुभवी खेळाडू आणि पनवेल क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, क्रिकेटमधून निवृत्ती घेणे हा प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा निर्णय आहे. पण इंग्लंडमधील मालिकेनंतर तो निवृत्त होईल अशी मला अपेक्षा होती. इंग्लंड मालिका खूप कठीण असणार आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या अचानक निवृत्तीचा भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल. अस प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांनी म्हटल आहे.