कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्याने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तर्फे जिल्हाप्रमुख रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा धुळे येथे आंदोलन करून कृषिमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामा मागितला. महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने चांगलेच कुप्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यावर आल्यास त्यांचे पत्त्यांचा हार देऊन स्वागत करण्यात येईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्यांचा रमी गेम खेळत होते. हि शेतकऱ्यांचा थट्टा आहे. हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे. शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या आपुलकी नाही. असा कृषी मंत्री सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला.

संबंधित बातम्या