निजामपुर पोलीस स्टेशनला दिनांक २१/०९/२०२५ रोजी शांताराम गोरख पाटील रा.बळसाणे ता. साक्री यांनी तक्रार दिली की, दिनांक १८/०९/२०२५ सकाळी ०७.०० ते दिनांक १९/०९/२०२५ रोजी सायंकाळी १६.०० वाजेच्या दरम्यान ते नाशिक येथे गेले असल्यामुळे बळसाणे गावातील त्यांच्या बंद असलेल्या घराचा दरवाजा उचकटून घरफोडी करण्यात आली.
वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मयुर भामरे यांनी गुप्तबातमीदारांच्या मार्फत या गुन्ह्यातील आरोपी
१) अजय बापु कोळी,
२) मुकेश पावबा धगर
३) दिपक पंडीत शिरसाठ, सर्व रा. बळसाणे ता. साक्री जि.धुळे यांनीच हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयासमोर हजार केले असता त्यांना ५ दिवसांच्या कस्टडीमध्ये घेण्यात आले.
कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यात घरफोडी करुन चोरी नेलेले ६ तोळे सोने हे बृहन्मुंबई येथुन निजामपुर पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतलेले आहे. या गुन्ह्यात रोख रक्कम, ६ तोळे सोने व इतर असा एकुण ४,२९,०००/-रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
हि कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मयुर एस. भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि चंद्रकांत गायकवाड, पोउपनि मधुकर सोमोसे, पोउपनि यशवंत भामरे, असई पाटील (स्थागुशा धुळे), असई रुपसिंग वळवी, पोहेकॉ प्रदीपकुमार आखाडे, पोहेका नारायण माळचे, पोहेका आर.यु.मोरे, पोहेकों प्रशांत ठाकुर, पोकों दिपक महाले, पोकों राकेश बोरसे, पोकों गौतम अहिरे, पोकों परमेश्वर चव्हाण, पोकों शरद पाटील, पोकों टिलु पावरा, पोकों मुकेश दुरगुडे, पोकों श्रीराम पदमर, चापोकों मनोज माळी यांनी केली आहे.