दिनांक ११/०९/२०२५ रोजी मा. प्रभारी अधिकारी श्री. मयूर भामरे. सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत पेटले, छडवेल, विटावे गावात काही गावठी हातभड्डीची दारु गाळताना तसेच विक्री करत आहेत. छडवेल कोडे गावाच्या शिवारातील इसडे गाव रोडावरील कच्चा रस्त्यालगत किशोर विश्वास बेडसे याच्या शेतात काटेरी झाडाझुडपात सकाळी ०८.१५ ते १२.०० वाजेच्या दरम्यान या तीन ठिकाणी छापा मारुन खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सुपु नवल भिल वय-५५ वर्षे रा. पेटले ता. साक्री जि. धुळे, यांच्याकडून दाह व दारु गाळण्यासाठीचा एकुण-८८०००/-रुपयेचा मुद्देमाल व,
किशोर विश्वास बेडसे रा.छडवेल कोर्ड ता. साक्री जि. धुळे. शेत मालक, परशुराम भाईदास कोतवाल वय-३२ वर्षे रा. ससदे ता. शहादा जि. नंदुरबार यांच्याकडून दारु व दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दारू गाळण्यासाठीचा एकूण-१.६३,०००/- रुपयेचा मुद्देमाल तसेच,
दिलावर पंडीत अहिरे वय-३५ वर्षे रा.विटावे ता. साक्री जि.धुळे, यांच्याकडून दारु व दारु गाळण्यासाठीचा एकूण १५०००/- रुपयेचा मुद्देमाल.
असा एकुण-२,६६,०००/- रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मयूर एस. भामरे यांनी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, आपआपल्या शेतात कोणत्याही प्रकारच्या आरोपींना गावठी हातभठ्ठीची दारु अथवा कोणतेही अवैध धंदे विक्री करण्यासाठी कोणतेही सहकार्य करु नये अन्यथा आल्याला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी श्री. मयूर एस. भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि वाय. आर. भामरे, पोहेकों नारायण माळचे, पोहेकॉ रतन मीरे, पोहेको नागेश सोनवणे, पोना खंडेराव पवार, पोकों दिपक महाले, पोकों राकेश महाले, पोको सागर थाटशिंगारे, पोकों प्रविण पवार, पोका पृथ्वीराज शिंदे, मपोकों नम्रता मगर, मपोकों सुनिता पवार यांच्या पथकाने केली आहे.