शरद पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आज कळंबोली या ठिकाणी भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. माणिकराव कोकाटेंचा सोडाच कोणाचाही राजीनामा होणार नाही. अशा प्रकारची खरमरीत टीका यावेळी त्यांनी राज्य सरकारवर बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये आवाज उठवत आहे, उठवत राहील अशा प्रकारची भावना ही व्यक्त केली.