कुठलीही योजना बंद होणार नाही, सर्व योजना सुरूच राहणार – देवेंद्र फडणवीस

कुठलीही योजना बंद होणार नाही, सर्व योजना सुरूच राहणार – देवेंद्र फडणवीस
  • MG News
  • ऑक्टोबर 14 2025

Share on  

"राज्यातील कोणतीही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. सर्व सरकारी योजना सुरूच राहणार आहेत," असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यावर आर्थिक भार आला असला तरी, कोणतीही फ्लॅगशिप योजना थांबवली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आढावा:
फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विभागवार दौरे ठरवले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांचा आढावा घेण्यात आला. मुंबई वगळता बाकी सर्व विभागांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील नियोजन, कार्यकर्त्यांना दिशा देणे आणि तयारीचे मार्गदर्शन हे उद्दिष्ट या बैठकींचे होते.”

ते पुढे म्हणाले, “जिथे शक्य आहे तिथे महायुतीने लढायचं आहे, मात्र त्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेणार आहे. जिथे युती शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत राहील, आणि कोणीही मित्रपक्षावर टीका करणार नाही.”

शेतकरी मदतीबाबत आश्वासन:
राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “दिवाळीपूर्वी मदत देण्याचा निर्णय झाला होता. मदत देणे सुरू आहे, त्यामध्ये काही वेळ लागू शकतो,” असे ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीवरील भूमिका:
मुंबई महापालिकेतील आघाडीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही. मात्र कोणासोबतही गेलो तरी महाराष्ट्रात भाजप आणि महायुती मोठ्या विजयाकडे जातील, असा आम्हाला विश्वास आहे.”

अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया:
एकनाथ शिंदेबाबत अंबादास दानवे यांच्या ट्विटवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “दानवेंना शिंदेंबद्दल चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, ही स्वतःमध्ये एक महत्त्वाची बाब आहे.”

कार्यकर्त्यांना कानमंत्र:
कार्यकर्त्यांशी संवादाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “कार्यकर्ते कानमंत्र देतात आणि कान उघडणीही करतात. ही टू वे प्रोसेस आहे.”

सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा अपूरी:
ते पुढे म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार आज पूर्ण वेळ उपस्थित होते, मात्र त्यांच्याशी माझी चर्चा होऊ शकली नाही.”

संबंधित बातम्या