शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या. तसेच उद्धव साहेब, राज साहेब एकत्र या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.