७० हजारांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह एकास अटक

 ७० हजारांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह एकास अटक
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

हमीभाव योजनेंतर्गत ज्वारी विक्रीच्या देयकासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे आणि सेवानिवृत्त लेखा निरीक्षक देवानंद गंगाराम खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजारांचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता.२३) सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व मुठे ले-आऊट परिसरात करण्यात आली. शेतकऱ्याने हमीभाव केंद्रावर ज्वारी विकल्यानंतर देयक मिळावे आणि भविष्यातही अडथळा न येण्यासाठी टेकाळे यांनी ७० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने एसीबीकडे केली होती.
 त्यानंतर २१ ते २३ जुलैदरम्यान लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये लाचेची रक्कम निश्चित झाली होती. त्यातील २५ हजारांचा पहिला हप्ता खासगी व्यक्ती देवानंद खंडाळे यांच्या मार्फत स्विकारताना त्यांना पंचासमक्ष प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे आणि देवानंद खंडाळे यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या