कोरोना काळातील कांदा आंदोलन : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर

कोरोना काळातील कांदा आंदोलन : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर
  • MG News
  • एप्रिल 28 2025

Share on  

कोरोना काळातील कांदा आंदोलन : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कोरोना काळात कांदा बाजार भाव प्रश्नी आंदोलन केल्याच्या संदर्भात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आठ ते नऊ पदाधिकाऱ्यांवर लासलगाव पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर झाले पोलिसांचे जाब जबाब तसेच सदाभाऊ खोत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे जब जबाब झाले असून लवकरच पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावर निकाल दिला जाणार आहे. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला असून लवकरच आमच्या बाजूने न्यायदेवता निकाल देतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.05:11 PM

संबंधित बातम्या