अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही योजना व्यर्थ- विक्रम काळे

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही योजना व्यर्थ- विक्रम काळे
  • MG News
  • जून 24 2025

Share on  

सरकारने अकरावीचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया मार्फत करण्याची गरज नव्हती. यापूर्वी देखील महाविकास आघाडी सरकार असताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला होता. पण त्यांचा तो निर्णय आम्ही हाणून पाडला होता. आजही शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत, पण अद्यापही अकरावीचे कॉलेज सुरू झाले नाहीत.

आजही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आजही 100% ऍडमिशन अकरावीचे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने घेतलेल्या ऑनलाईन प्रवेशाचा हा निर्णय फसला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

संबंधित बातम्या