बीड जिल्ह्यात यावर्षी जून आणि जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरणे अद्यापही पूर्ण क्षमतेने भरले नसून, बीडसह माजलगाव शहराची तहान भागवणारे माजलगावचे धरण अद्याप १६% टक्क्यावरच भरलेले आहे. त्यामुळे अद्याप बीडकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गतवर्षी हे धरण जुलै महिन्यामध्ये ८०% टक्के भरल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांनी दिली आहे. मात्र यावर्षी जिल्ह्यात रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यामध्ये अद्यापही कायम असून, मोठा पाऊस झाला तर छोटी मोठी धरण पूर्ण क्षमतेने भरतील. अशी आशा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण हे सर्वात मोठे धरण असून जिल्ह्याची तहान भागवणारे हे धरण आहे. मात्र या धरणात आज फक्त १६ टक्के पाणी असून, जायकवाडी प्रकल्पातून या धरणात पाण्याची आवक सुरू असल्याचे देखील येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.