धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये नको यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलने केली आहेत. मात्र, धारावीचे पुनर्वसन मुलुंड मध्येच होणार हे निश्चित झाल्यावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. मुलुंड बंद चे लावलेले बॅनर प्रशासनाने हटवले आहेत. मात्र, काँग्रेस उपोषणावर ठाम आहे. महाविकास आघाडीच्या या मुलुंड बंद ला मुलुंडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर स्टेशन परिसरात दुकाने चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकही धारावी रहिवासी मुलुंड मध्ये स्थलांतरित होणार नाही, क्या हुवा तेरा वादा असे बॅनर उपोषण स्थळी लावण्यात आले आहे.