ओझर नगरपरिषद मार्फत खाजगी संस्थेतर्फे मिळकत नोंदणी व नंबर देण्याचे काम सध्या चालू आहे. यावेळी ओझर शहर युवासेनेकडून सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना अशी विनंती करण्यात आली आहे की, मोजणी करणारे लोक आले तर त्यांना कच्चे शेड, जनावरांचे निवारा शेड ( गोठा), कांदा चाळ हे सर्व मोजण्यास नागरिकांनी विरोध करावा. तसेच मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत महिला कर्मचारी असेल तरच घराची अंतर्गत मोजणी करण्यास परवानगी द्यावी. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेकडून नागरिकांना करण्यात आले.