पालघर: नवऱ्याला सोबत घेतले आणि प्रियकराची केली हत्या !

 पालघर: नवऱ्याला सोबत घेतले आणि प्रियकराची केली हत्या !
  • MG News
  • एप्रिल 30 2025

Share on  

 पालघर: नवऱ्याला सोबत घेतले आणि प्रियकराची केली हत्या ! 

प्रेमसंबंधातून नवऱ्याला सोबत घेऊन प्रेयसीने आपल्या बॉयफ्रेंडचा काढला आहे. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर गावात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर तरूणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरूणाचे नाव सोमनाथ दिघे असे होते. तो ३० वर्षांचा होता. तर, मालवंती दिघे आणि दीपक दिघे असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. २ दिवसांपूर्वी कामावरून परतत असताना रस्त्यात त्याची प्रेयसी दिसली. प्रेयसी भेटल्यानंतर मागून तिचा नवरा आला. दोघांनी मिळून त्यांनी सोमनाथवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.तरूणाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडने घटनास्थळ गाठले. तसेच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात समोर आलं की, मालवंती आणि सोमनाथ या दोघांचं लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होतं. मात्र, त्यानंतर मालवंती आणि दीपकचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरही दोघांमधील संबंध कायम होते. यामुळे दीपकला वारंवार संशय येत होता.

संबंधित बातम्या