पंढरपूर : राष्ट्रवादीच्या एकीकरणावर सुनेत्रा पवारांचा हात जोडून पाठिंबा
राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. जे काही होईल ते आपण बघालच असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर खासदार सुनेत्रा पवार यांनी हात जोडत अधिक बोलणे टाळले.
पंढरपूर जवळील वाखरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवार आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीच्या वाढीव हप्ता बद्दल अजित पवार निर्णय घेतील ते जे बोलतात ते करतात आपल्याला माहित आहे. असे म्हणत अजित पवारांच्या शब्दाला जागण्याच्या स्वभावाचे कौतुक केले.