पनवेल: शेकापचा वर्धापन दिन; राज ठाकरेंसह मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार

पनवेल: शेकापचा वर्धापन दिन; राज ठाकरेंसह मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

 शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन आज पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. त्यामुळं या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, लवकरच पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यानंतर शेकापला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचं चित्र दिसून येत आहे. तसच या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिवसेना उबाठा नेते संजय राऊत, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
 

संबंधित बातम्या