रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

 रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

बीड शहरातील धानोरा रोडची मागील पंधरा वर्षांपासून दुरावस्था आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते. त्यामुळे या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह स्थानिक नागरिकांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात होडी चलाव आंदोलन करून लक्ष वेधले आहे. यावेळी खड्ड्यांना लोकप्रतिनिधींचे नाव देऊन सन्मान करण्यात आला.

भूसंपादन आणि मावेजाच्या मागणी संदर्भात रस्त्याचे काम रखडले गेले आहे. न्यायालयीन प्रक्रिया देखील याबाबत सुरू आहे. वारंवार स्थानिकांकडून मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. सदरील प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

संबंधित बातम्या