दिंडोरीतील वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण अंधारात– जनरेटर शोभेची वस्तू

दिंडोरीतील वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण अंधारात– जनरेटर शोभेची वस्तू
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

आज शनिवार असून ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लाईट नसल्यामुळे डॉक्टर, नर्सेस आणि रुग्ण अंधारात सेवा देत आहेत. सलाईन सुरू असलेल्या रुग्णांनाही नीट झोप मिळत नाही – कारण अंधारामुळे रुग्ण जागेवर आहे की नाही हेच ओळखणे कठीण झाले आहे.

या ठिकाणी चार वर्षांपूर्वी जनरेटर आणण्यात आला असला, तरी तो वापरातच नाही. सध्या तो रुग्णालयाच्या आवारात एक शोभेची वस्तू बनून उभा आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या