बीडच्या पाटोदा शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीवर आलेल्या पती-पत्नीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे पती-पत्नी पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथील रहिवासी असून, आज पाटोदा येथील बाजार दिवस असल्यामुळे बाजारासाठी येत होते. संबंधित पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना रुग्णालयासमोर अचानक आलेल्या बसने त्यांना जबर धडक दिली. बस क्रमांक एमएच-१४ एक्स ७९६२ असा असून बाळु केशव वायकर आणि त्याची पत्नी लता बाळु वायकर हे धडकेनंतर दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले आणि गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सदरील बस ही नांदेडकडून पुण्याकडे जात असताना समोरून अपघात झाला दोघेही जागेवर ठार झाले.