भारतात पेट्रोलचे दर ८-१० रुपयांनी वाढणार!

भारतात पेट्रोलचे दर ८-१० रुपयांनी वाढणार!
  • MG News
  • जुलै 21 2025

Share on  

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला ५० दिवसांत युद्ध संपवण्याची धमकी दिली आहे, नाहीतर १००% टैरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
रशियन तेलावर अवलंबून असलेल्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर ८-१० रुपये प्रति लिटर वाढण्याची शक्यता आहे.

भारताने ४० देशांकडून तेल आयातीसाठी बॅकअप प्लॅन तयार केला असला, तरी रशियाचा पुरवठा खंडित झाला तर बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती १३०-१४० डॉलरपर्यंत जाऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ट्रम्प आता रशियावर दबाव आणत आहेत. त्यांनी रशियाला स्पष्ट धमकी दिली आहे की, ५० दिवसांच्या आत  रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध संपवले नाही तर रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर १००% टैरिफ लावले जाईल. ही अप्रत्यक्ष धमकी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांसाठी आहे रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त कच्चे तेल विकत घेत आहेत.


रशिया अमेरिकेच्या दबावाखाली झुकण्याच्या मूडमध्ये नाही. परंतु, ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे रशियाकडून भारताला येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात भारताला पर्यायी देशांकडून तेल आयात करावे लागेल.

भारत सध्या आपल्या गरजेच्या ३५-४०% कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. पुरवठा कमी झाला, तर जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किमती वाढतील आणि त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल -डिझेल १० रुपये प्रति लिटर महाग होऊ शकते.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले की, रशिया जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या सुमारे १०% (दररोज ९ दशलक्ष बॅरल) पुरवठा करतो. हा पुरवठा बाजारातून कमी झाला, तर उरलेल्य ९०% उत्पादनातून संपूर्ण जगाला तेल खरेदी करावे लागेल, ज्यामुळे किंमतींमध्ये प्रचंड वाढ होईल.

भारत आणि चीन हे रशियाकडून कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपेकी ८८% तेल आयात करतो, त्यातील ३८% वाटा रशियाचा आहे. २०२२ मध्ये युक्रेन युद्धापूर्वी भारतावा रशियन तेलातील वाटा २% पेक्षाही कमी होता. परंतु, युद्धानंतर रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू झाल्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल खरेदी करून फायदा घेतला.
 

संबंधित बातम्या