मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. गृहराज्यमंत्र्याचा आईच्याच नावाने असलेल्या बारमध्ये अश्लील कृत्ये होत असतील, सर्व नियम धाब्यावर बसवले जात असतील तर कारवाई कोण करणार? असा प्रश्नही शिवसेना उद्धवव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेकी की, रामदास कदम म्हणत आहे की, आम्ही तो बार चालवायला दिला आहे, पण त्याचा कोणताही नोकरनामा नाही. त्यात मालकाची सही लागते ती नाही. बारचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले आहेत. बारममध्ये आर्केस्ट्रासाठी पाच मुलींना परवानगी असताना छाप्यात 14 मुली तिथे आढळून आल्या. जे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर धाडी टाकायला जातात त्यांना आपल्याच बारमध्ये काय चालते हे कसे माहित नाही?
रामदास कदम यांनी पत्नीच्या नावाने बार काढला. या बारमध्ये अश्लील कृत्ये सुरु होती, मुलींवर पैसे उधळले जायचे. पत्नी-आईच्या नावाने सुरु केलेल्या बारमध्ये अशी कृत्ये होत असतील तर लाज वाटायला हवी, असा घणाघातही अनिल परब यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वाढदिवस आहे मी त्यांना त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे प्रताप वाढदिवसाची भेट म्हणून देणार होतो पण ते आज गडचिरोलीत असल्याने उद्या सगळी कागदपत्रे देणार आहे. असे यावेळी अनिल परब यांनी सांगितले.