नाशिकमध्ये पोलिसांची कारवाई : गंभीर गुन्हा टळला

नाशिकमध्ये पोलिसांची कारवाई : गंभीर गुन्हा टळला
  • MG News
  • ऑक्टोबर 1 2025

Share on  

नाशिक  पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईत गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेला इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. 
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या. 
गौरव खांडरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून राष्ट्रपाल भगत हा प्राणघातक हत्यार घेऊन दत्त चौक, सिडको परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती.  ही माहिती विपोनी जगवेंद्रसिंघ राजपूत यांना कळवण्यात आली. त्या अनुषंगाने पथकातील अधिकाऱ्यांनी दत्त चौक, सिडको परिसरात सापळा लावून सव्वाचार वाजेच्या सुमारास राष्ट्रपाल विठ्ठल भगत (वय ३३) वर्षे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चॉपर जप्त करण्यात आले.

अधिक विचारपूस केली असता, त्याचा एका इसमा बरोबर व्यवहार झालेला असून त्याचे राहिलेले पैसे परत देत नसल्याच्या  कारणावरून तो त्यास चॉपर घेऊन मारण्यास जात असल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जगवेंद्रसिंग राजपूत, दिलीप सगळे, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, गौरव खांडरे आणि सविता कदम यांनी केली आहे. 

संबंधित बातम्या