एन्काऊंटर प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पत्रकार परिषद

एन्काऊंटर प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पत्रकार परिषद
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांपैकी एकाचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री साजापूर शिवारात घडली होती.  या प्रकरणाची सविस्तर माहिती सविस्तर देण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी माहिती देतांना प्रवीण पवार यांनी सांगितले की 
 उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या प्रकरणात हवा असलेला मुख्य आरोपी  अमोल खोतकर एका हॉटेलमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. मात्र, आरोपीला पोलीस दिसताच त्यानं पोलिसांच्या अंगावर गाडी घालत गोळी चालवली. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर, त्याचा साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर रेकॉर्डवरील गुन्हेगार होता १५मे रोजी पहाटे ४वाजता उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील दरोडा टाकण्यात आला होता.

संबंधित बातम्या