कल्याणमधील बैलबाजार परिसरातील सुप्रीम ही हायप्रोफाईल इमारत आहे. या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर अवंतरा नावाने मजास पार्लर सुरु होते. मजास पार्लरच्या नावाखाली देह व्यापार सुरु असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला. या दरम्यान दहा तरुणींची सुटका करीत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश चव्हाण आणि नौशाद अशी या आरोपींची नावे आहेत. मसाज पार्लर मालकाचा शोध पोलिस घेत आहेत.