अट्टल मोटरसायकल चोरट्याकडून ८ मोटरसायकल पोलिसांनी घेतल्या ताब्यात

अट्टल मोटरसायकल चोरट्याकडून ८ मोटरसायकल पोलिसांनी घेतल्या ताब्यात
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये चोरीला गेलेल्या मोटरसायकली संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना गोपनीय माहिती मिळाली की, साक्री तालुक्यातील वस्मार या गावात चोरीची मोटरसायकल घेऊन एक तरुण फिरत आहे. त्यांनी तात्काळ शोध पथकाला या तरुणाला ताब्यात घेण्यास सांगितले. यावेळी संबंधित तरुणाला पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याचे नाव गोलू उर्फ आदिनाथ युवराज बोरसे असल्याचे लक्षात आले.

गोलू बोरसे हा अट्टल मोटर सायकल चोर असल्याने पोलिसांनी त्याला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी तब्बल ३ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ८ मोटरसायकल पोलिसांच्या स्वाधीन केल्या असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या