पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष

पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष
  • MG News
  • सप्टेंबर 7 2025

Share on  

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा ,दुई ,सुकळी ,डोलारखेडा फाटा पर्यंत मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहे तरी प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे .तरी या रस्त्याने अनेक वेळा खासदार आमदार जात असता मात्र त्यांना या रस्त्याशी काही घेणं देणं नाही असं दिसून येत आहे.  तरी या रस्त्याने छोटे-मोठे वाहनधारकांना मोठी कसरत करावी  लागत आहे. या  रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असं सर्व जनतेकडून बोलले जात आहे .
सध्या पावसाळयाचे दिवस  चालू आहे तरी रस्त्याचे काम झाले नाही तर काही ठिकाणी थोडासा रस्ता करण्यात आला, मात्र बाकीचे खड्डे जसेच्या तसेच आहे. खड्ड्यामध्ये मोठे पाणी साचले आहे तरी पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.या रस्त्याने वाहन चालक ये-जा करत आसतात. मोठ मोठे ट्रक या रस्त्याने येतात जातात खूप वेळेस  रस्त्यावर अपघात झालेले आहे .तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ते चांगले करावे भरपूर रस्ते फोरवे झालेले आहे पण प्रशासन व सरकार या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी हा रस्ता लवकरात लवकर चांगला करण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. प्रशासन व सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

संबंधित बातम्या