११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये साखळी स्फोट झाले. या घटनेत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सात वेगवेगळ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये हे स्फोट झाले. चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ग्रांट रोड स्टेशनवर प्राध्यापक प्रभाकर मिश्रा चढले. माटुंगा आणि माहीम दरम्यान त्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा ते दाराजवळ उभे होते. मात्र, ते या भीषण घटनेतून बचावले.
या घटनेमुळे त्यांच्या डाव्या कानाची ऐकण्याची शक्ती पूर्णपणे गेली, तर उजव्या कानावरही परिणाम झाला. साखळी स्फोटांचे शेकडो पीडित आणि त्यांचे कुटुंबीय आजही त्या घटनेचे दुःख आणि परिणाम सहन करत आहेत. असे प्राध्यापक प्रभाकर मिश्रा यांनी सांगितले.