प्रहार जनशक्ती पक्षाचं रस्ता रोको आंदोलन

प्रहार जनशक्ती पक्षाचं रस्ता रोको आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वीजबिल माफी, सिंचन सुविधा, पीकविमा आणि इतर कृषीविषयक समस्यांसंदर्भात आज नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी ठिय्या देत रस्ता रोको आंदोलन केले.

सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी,वीजबिल माफ करावं आणि शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा, सिंचन प्रकल्प पूर्ण करून, पाणीपुरवठा सुरळीत करावा,पीकविमा योजनेतील अपूर्ण भरपाई तत्काळ द्यावी,सेंद्रिय खते व बियाण्यांच्या दरात सवलत द्यावी,कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमीभावाने खरेदी सुरू करावी  या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले .सरकारने वारंवार आश्वासने दिली, पण अंमलबजावणी शून्य आहे. शेतकरी अडचणीत असताना आमचा हा लढा मागे हटणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. आंदोलनात प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संबंधित बातम्या