देशाच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक राहण्याचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे रेकॉर्ड विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे टाकले असून, इंदिरा गांधीनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान मोदी यांच्या नावावर झाल्याने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या रेकॉर्डचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाचे मानबिंदू आहेत. त्यांच्या अतिशय समर्पित भावनेत देशाची सेवा झाली आहे. गोरगरीबांना न्याय देण्याचे काम त्यांच्या संकल्पनेतून झाले आहे. जगाच्या पाठीवरच तिसरी महासत्ता होण्याची स्वप्न त्यांच्या माध्यमातून आपण सर्व जण भाग्यवान आहोत की, असे पंतप्रधान आपल्याला लाभले आहे. असल्याचेही दादा भुसे म्हणाले.