परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, यासह एसआयटीने तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा. यासाठी उद्या परळीच्या कनेरवाडी परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाविषयी आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या आहेत की, आंदोलन अहिंसेचे असणार आहे. या आंदोलन सहभागी होण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणतेही हिंसात्मक कृत्य करू नये. एसआयटीने माझा तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा आणि तात्काळ आरोपींना अटक करावी. यासाठी हे आंदोलन असणार आहे. असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.