त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.पत्रकार संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित गुंडांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच प्रवेशकर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
याप्रसंगी तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिव विठ्ठल धनगर, विनायक वाडेकर सर, सचिन झनके, किरण पाटील, अतिख खान, पंकज तायडे,कैलास कोळी, सुभाष धांडे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी रवी गोरे, एमजी न्यूज चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे सुमित बोदडे आणि मंगेश ढोले आदी उपस्थित होते.
एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर