प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन राज्यभर रास्ता रोको आंदोलन ची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर गोंदियाच्या तिरोडा तुमसर या राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती नंतर पोलिसांच्या मदतीने प्रहार कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठविण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा खणखणीत इशारा यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी दिला.