दिव्यांगांसह प्रहारचा अंदरसुलला रस्ता रोको, नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला

 दिव्यांगांसह प्रहारचा अंदरसुलला रस्ता रोको, नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक - संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला. यावेळी या रास्ता रोको आंदोलन मध्ये दिव्यांग बांधवांसह शेतकरी देखील सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांग बांधवांना ६ हजार रुपये मानधन मिळावे, अशा विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेकडून अंदरसुल येथे चक्काजाम करण्यात आला.

संबंधित बातम्या