प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दसरा चौक येथे निदर्शने

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दसरा चौक येथे निदर्शने
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला कोल्हापुरातही जोरदार पाठिंबा मिळाला.

कोल्हापुरातील प्रहार कार्यकर्त्यांनी दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, तसेच दिव्यांग व विधवा नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यभरातील चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संबंधित बातम्या