फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून, त्यात तिने पोलिस अधिकाऱ्यांवर अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
सुसाईड नोटनुसार PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे.
या घटनेनंतर पोलिस प्रशासनात एकच खळबळ माजली असून, सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. फलटणमधील हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा ठरला आहे.