पुणे: एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद

पुणे: एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे पोलिसांकडून काहीवेळापूर्वीच रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी गेल्या काही वेळापासून पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. 

एकनाथ खडसे यांच्याकडून वारंवार सीडी बाहेर काढण्याची भाषा सुरु होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई पकडला जाणे, हा निव्वळ योगायोग आहे की यामागे राजकीय कनेक्शन आहे, याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या